CTES English Medium School

Scholaship And Caste Validaty

Scholarship

भारत सरकार शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याकरता सूचना ११ वी व १२ वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेच्या SC,ST,NT,SBC,OBC विद्यार्थ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा

अ .शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याकरीता खालील प्रमाणे पात्रता असावी

1. विद्यार्थी SC,ST,NT,SBC,OBC या जात प्रवर्गातील असावा

2. विद्यार्थ्यांच्या वडिलांचे किंवा वडिल हयात नसल्यास आईचे वार्षिक उत्पन्न खालील प्रमाणे असावे.

उत्पन्नाची मर्यादा बदलल्यास आपणास तशी सूचना देण्यात येईल

भारत सरकार शिष्यवृत्ती फ्रीशिप
SC:- 2,50000/- पेक्षा कमी SC:- 2,50000/- पेक्षा जास्त व पुढे मर्यादा नाही
ST:- 2,50000/- पेक्षा कमी ST:- 2,50000/- पेक्षा जास्त व पुढे मर्यादा नाही
NT:- 1,50000/- पेक्षा कमी NT:- 1,50000/- पेक्षा जास्त व 8,00000/- च्या आत
SBC:- 1,50000/- पेक्षा कमी SBC:- 1,50000/- पेक्षा जास्त व 8,00000/- च्या आत
OBC:- 1,50000/- पेक्षा कमी OBC:- 1,50000/- पेक्षा जास्त व 8,00000/- च्या आत

ब .शिष्यवृत्ती व जातउत्पन्न (फ्रीशिप) फॉर्म सोबत खालील प्रमाणे कागदपत्रे

1. स्वतःचा जातीचा दाखला

२. प्रवेशपावती (प्रवेश पावती ऑफिस मधून सौ चैताली पाटील यांच्याकडून घ्यावी)

३. वडिलांचा किंवा वडिल हयात नसल्यास आईचा सन २०२३-२४ चा वार्षिक उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला मा. तहसीलदार यांच्याकडूनच आणावा.

४. अनु.जातीचे (ए.सी व एस.टी) विद्यार्थी वगळून इतर प्रवर्गाच्या तिसऱ्या अपत्याला सवलत लागू नाही. (मुलींना अपत्या क्रमांकाची अट नाही.)

५. रेशन कार्ड

६. इ. 10 वी व इ.11 वी मार्कशीट

७. शाळा सोडल्याचा दाखला

८. स्वतःच्या खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छाया प्रत.

९. आधार कार्ड व आधार कार्ड बँकेशी संलग्न केल्याची पावती.

१०.स्वतःचा अधिवास दाखला (Nationapty & Domicile)

छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना ११ वी व १२ वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेच्या SC,ST,NT,SBC,OBC विद्यार्थ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा

अ .शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याकरीता खालील प्रमाणे पात्रता असावी.

१. विद्यार्थी हा SC,NT,SBC जातीचा असावा

२. सदर विद्यार्थ्यांना 10 वी ला 75% टक्के व त्याच्यापेक्षा जास्त गुण असावेत

३. इ. 10 व इ.11 वी मार्कशीट

४. शाळा सोडल्याचा दाखल्याची छायाप्रत

५. आधारकार्ड व आधारकार्ड बँकेशी संलग्न केल्याची पावती.

६. स्वतःच्या जातीच्या दाखल्याची छायाप्रत

७. स्वतःचा अधिवास दाखला (Nationapty & Domicile)

८. स्वतःच्या खाते पासबुकाच्या पहिला पानाची छायाप्रत


Caste Validity

SC,NT,SBC,OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी जातपडताळणी करिता www.barti.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर अर्ज करावा आणि खालील प्रमाणे कागदपत्र कार्यालयात जमा करावे.

1. फॉर्म (Online) व पैसे भरल्याची पावती.

2. विद्यालयाचे विनंती पत्र.

3. अर्जदाराचा जातीचा दाखला.

4. अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला प्राथमिक व माध्यमिक.

5. वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला (प्राथमिक)

6. अर्जदाराच्या वडीलांचा जातीचा दाखला. (उपलब्ध असेल तर)

7. सख्खे काका/ आत्याचा/ आजोबाचा शाळा सोडल्याचा दाखला (प्राथमिक)

8 शपथपत्र (नमुना नं 17 व नमुना नं 3 )

9. नावात बदल असल्यास शपथपत्र किंवा राजपत्र.

10. वडिल/ काका/आत्या ह्यांना जातपडताळणी मिळाली असल्यास त्याची प्रत. (उपलब्ध असेल तर) वरील नमुद केलेले कागद पत्रात जातीची नोंद नसेल तर खालील कागदपत्र जोडावे.

11 . वडिल, आजोबा, पंजोंबा यांचे जातीची नोंद असलेले महसुल दस्तऐवज उदा . गाव नमुना 14, जुने खरेदीखत इत्यादी

12 . ओ. बी. सी / एस.बी.सी Date of Birth 1960 पूर्वीचा पुरावा जातीचा उल्लेख पाहिजे.

13 . एन. टी / वि.जे Date of Birth 1955 पूर्वीचा पुरावा जातीचा उल्लेख पाहिजे.

14. एस. सी Date of Birth 1950 पूर्वीचा पुरावा जातीचा उल्लेख पाहिजे.

15. सर्व कागदपत्र Attested करणे (M.K.Junior कॉलेजच्या मुख्याध्यापकां कडूनच करून घेणे)

16. Identity Card ( ID Card)

ST प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी जातपडताळणी करिता www.etribevalidity.mahaonline.gov.in या संकेत स्थळावर अर्ज करावा.

आवश्यक कागदपत्र

1. कनिष्ठ महाविद्यालयाचे शिफारस पत्र

2. स्वत: चा जातीच्या दाखला (ओरीजनल)

3. प्रतिज्ञापत्र व वंशावळ (ज्याची जातपडताळणी झाली आहे. त्यांचे वंशावळीत नाव आवश्यक)

४. स्वतःचा प्राथमिक व माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला.

५. प्राथमिक शाळेचे रजिस्टर १ चा उतारा.

६. स्वतःचा जन्म दाखला (असल्यास जोडावा)

७. ७/१२ चा उतारा (ज्याच्या जमीन नावी आहे. त्यांचे वंशावळीत नाव आवश्यक)

वडिलांची कागद पत्रे

१. प्राथमिक किंवा माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला

२. जातीचा दाखला

३. प्राथमिक शाळेचे रजिस्टर १ चा उतारा

४. गाव नमुना 14

(पुराव्या दाराचे वंशावळीत नाव आवश्यक) गाव नमुना 14 नसेल तर नोंद नसल्याचे पत्र

रक्त्याच्या नातेवाईकाची कागदपत्रे

(वडील, सख्खे/ चुलत/ भाऊ/बहीण/ काका/ आत्या/ आजोबा)

1. शाळा सोडल्याचा दाखला

2. जातीचा दाखला

3. जातवैधता प्रमाणपत्र

4. 1950 च्या पूर्वीचा आजोबाचा दाखला किंवा ज्यावर जातीचा उल्लेख असलेला दाखला असेल तर जोडावा.

नोट:

1. ई-मेल आय डी

2. मोबाईल नंबर