के.डी.हायस्कूल ही ठाणे जिल्ह्यातील दुसरी व ग्रामीण भागातील पहिली खाजगी मान्यता प्राप्त शाळा आहे. सन १९१० साली ही शाळा सुरु झाली. सुरुवातीला चिंचणी च्या खाडीनाक्या वरिल डॉ.भात यांच्या दवाखाना असलेल्या घरात हि शाळा सुरु झाली. सुरुवातीला साधारण १०० ते १२५ विद्यार्थी होते. १९२१ पर्यंत तेथेच भरत होती. परंतु जसजशी विद्याथी संख्या वाढत गेली तसतशी वर्गाची चणचण भासू लागली. त्या वेळेचे शाळेचे मुख्याध्यापक श्री.पंढरीनाथ जोशीसर हे नरशिलाल शेठ कडे गेले. नरसीलाल सेठ व नगरशेठ यांनी कानजी धरमशी यांच्या मुलांना (मोतीलाल कानजी व पुरुषोत्तम कानजी यांना) शाळेची इमारत बांधून देण्याविषयी सुचविले समुद्रालगतची के.डी. हायस्कूलची जागा ही आत्माराम अनंत बाबरे यांची होती त्यांनी ती शाळेला देऊ केली व त्या जागेवर 1921 ला पुरुषोत्तम कानजी यांनी बांधकाम करून दिले. या बांधकामासाठी नरसीलाल शेठ यांनी मोफत विटा पुरविल्या व इंग्रजी इ आकाराची लहानशी शाळेची इमारत बांधली गेली. यात चौदा खोल्या व ड्रॉइंग हॉल बांधला होता. कै. कृष्णलाल वनजीवदास शहा ह्यानी या बांधकामाची संपूर्ण देखरेख केली. ते त्या काळाचे प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट होते व कानजी धरमशी कुटुंबाशी निगडित होते.
१९५७ साली शेठ प्राणजीवनदास कापडिया यांनी श्रीमती विजलीबाई विज्ञानमंदिर बांधून दिले. हर जीवन वसनजी ट्रस्टने इमारतीच्या दक्षिणेकडील पाच वर्ग बांधणीसाठी भरीव मदत केली. त्याचवेळी भव्य प्रार्थना मंदिराचे बांधकाम झाले. प्रिन्सिपल मणीराम मोरेश्वर सावे मेमोरियल १९६७ साली सर्व ग्रामस्थांच्या मदतीनेच बांधून संस्थेला अर्पित करण्यात आले. १९७६ साली चुनीलाल भवन बांधण्यात आले. १९९३ साली केशव गोविंद सावे शिक्षण मंदिर रुपी हॉलचे बांधकाम झाले.
माजी प्रिन्सिपल वृंदावन शेठ व जयाबेन शेठ यांच्या स्मरणार्थ १९८४ साली शेठ मास्तर मेमोरियल प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीचे बांधकाम यांच्या कुटुंबियामार्फत करून देण्यात आले
या व्यतिरिक्त स्कूल कॅन्टीन, दोन कर्मचारी निवास, जुन्या स्वच्छतागृहाचे नूतनीकरण व १५ नवीन स्वच्छता गृहाचे बांधकाम, शाळेभोवतालची भिंत, मुख्य इमारतीचे आवारात सिमेंटचे रस्ते इत्यादी स्वरूपाचे पूर्ण करण्यात आले. अजूनही काही खोल्यांची उणीव संस्थेत जाणवत आहे व त्यासाठी सर्वांनी यथाशक्ती मदत करण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय करता यावी म्हणून अमेरिकेतील आपल्या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या बहुमोल सहकार्याने सुसज्ज कॉम्प्युटर वर्ग कार्यरत आहे
विस्ताराचा एकूण विचार केल्यास १९२१ साली असलेल्या इमारतीत आज चौफुटीने वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त चित्रालय बोईसर येथे संस्थेचे स्वतंत्र इंग्लिश मीडियम ची शाळा पालकांच्या मुलाच्या सहकार्याने भव्य इमारतीसह दिमाखात उभी आहे.